Sunday, February 14, 2010

Monthly Expenses Comparison

Now that we have completed almost three years after returning to India, I thought that I should update the monthly cost comparison table. Please remember, personal choices make huge differences in living costs. If you get sucked into India's "status symbol" mentality then your numbers will easily surpass US numbers! :) I can attest that following numbers are listed while maintaining similar or better living standard for me and my family. And for those of you who know me personally know that I don't binge when it comes to enjoying life to fullest extent! :)


Here is a nice visual comparison (using a cool Google Gadget)


You can check my previous blog entry from three years ago at, http://usatoindia.blogspot.com/2007/08/monthly-expense-comparison.html













Tuesday, January 12, 2010

Next life by Woody Allen

Very interesting if you think about it.... :)

Saturday, January 09, 2010

2010 resolutions

माझे २०१० साठीचे संकल्प... कारणांसहित...

माझे २०१० साठीचे संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे.


संकल्प . - सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही.
कारण -
. - पल्लवी जोशी - आपण तिच्या घरी आरतीला बसल्यासारखं ती टाळ्या वाजवायला लावते. एकदा गीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग संगीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग गायक .... मग वादक.... मग प्रेक्षक..... मग श्रोते...... मग मान्यवर..... मग ती स्वत:..... असं नुसत्या टाळ्याच टाळ्या.... ! बर नुसत्या टाळ्या नाही तर जोरदार टाळ्या. वाट्टेल ते मॅचिंग करुन, वाट्टेल त्या गाण्याला, वाट्टेल त्या शब्दांनी, तिला का ठो कळत नसताना, मळमळेल इतकं कौतुक करते. अगदी कुणी ढेकर जरी दिला तरी, "काय अप्रतिम ढेकर दिलास आणि माझ्या खुप आवडीच्या ढेकरांपैकी एक ढेकर दिलास म्हणुन तुझे विशेष आभार.... " काय बोलयचं ह्यावर.... ?
. - अवधुत गुप्ते तिचा मोठा भाऊ - "अरे... अरे... अरे... काय भन्नाट, सुसाट, अचाट गायलास... मित्रा..... कानाचे पडदे पार फाडलेस बघ... अरे काय साजुक खाऊन नाजुक गळ्यातुन चाबुक ढेकर दिलास गड्या.... एक नम्बर.. माझ्या एकातरी गाण्यात हि हार्मनी वापरणार बघ मी.....
. बाळासाहेब मंगेशकर - (खयाल गायकी, शोभा गुर्टु, तंबो-याचा तारा, स्वातंत्र्यपुर्व काळ, ज्ञानेश्वर महाराज, आकाशवाणी अशा विविध विषयांवर बोलल्यानंतर सुमारे पावणे दोन तासांनी...) "...१९६३ मध्ये लताच्या रेकॉरडींगच्या वेळेस गाणं गाताना तिला असाच विलंबीत ढेकर आला होता. त्यावेळेस मी तिच्याकडुन वरचा लावुन घेतला आणि..... ..............................

.............................
.............................. .............................. ...................... .
.............................. ................ .....................
.......................... ...........................
असो .... !

संकल्प . - बायकोशी कधीही भांडणार नाही.

कारण - ह्याची सुमारे ६७ कारणं देऊ शकेन पण तुर्तास.....
. - ती तिच्या चुका मान्य करत नाही.
. - जीभेला हाड नसतं, हे ती सिद्ध करते.
. - परवा तिनी तिचे सगळे दोष मान्य केले पण पुढे म्हणाली की, " माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला आणि एकदा जरा आरशात........
.............................
अ सो.... !
संकल्प . - खोटं बोलणार नाही.
(
हे जरा अशक्य कोटीतलं होतय का ? बर मग ... खोटं बोलुन ऑफीसला दांडी मारणार नाही.)
कारण -
. - हयात व्यक्तींना मारल्यानी ब्रह्महत्येचं पाप लागतं.
. - ह्या दांडीची नोटीस देता येत नाही त्यामुळे सुट्टीची खातरी नसते. ती मिळालीच तर पकडले जाण्याची भिती दिवसभर वाटत राहते. सुट्टीचा आनंद मिळत नाही.
. - नेमकं बॉसच्या हातुन पण त्याच दिवशी ब्रह्महत्येचं पातक घडले असल्यास तो तिथं थेटरात भेटण्याची दाट शक्यता असते. ..आणि दुःख विसरायला आलोय हे कारण त्याला पटत नाही. त्याचं तिथं येण्याचं कारण सांगायची त्याला गरज नसते.
. - खरच ती हयात व्यक्ती कधी गचकली तर जाणं अवघड होतं आणि मग नविन हयात व्यक्तीच्या हत्येचं पाप....
.............................
अ सो.... !
संकल्प . - दारु पिणार नाही.
कारण -
. - तोल जातो.
. - पैसे जातात
. - चव जाते.
. - शुद्ध जाते.
. - दृष्टी जाते.
. - मजा जाते.
. - इज्जत जाते.
संकल्प . - कितीही ओळखीची वाटली तरी समोरची बाई जोपर्यंत ओळख देत नाही, तोपर्यंत मी बघुन हसणार नाही.
कारण -
. - तिच्याकडुन डाव्या गालावर...
. - संधीसाधु समाजाकडुन सर्वांगावर....
संकल्प . - पुण्यातल्या पीएमटी बसमध्ये पाऊल टाकणार नाही. (बसमध्ये बसणार नाही, असे लिहले नाहीये कारण आजपर्यंत मला कधीच बसायला मिळाले नाहीये.)
कारण -
. - उरलेले सुट्टे पैसे, चपला आणि सगळी हाडं परत मिळत नाही.
. - हव्या त्या स्टॉपवर उतरता येत नाही. जिथं उतरावं लागतं तिथं खाली कुणाची तरी दुचाकी असतेच. तो जिथं सोडेल तिथुन परत (बस करुनच) यावं लागतं.
. - पुढुन चढुन देत नाहीत, सर्कस करायचा अनुभव नसल्यास मागुन चढता येत नाही. ड्रायव्हर तोंडात गुटका असल्याने बोलत नाही, कंडक्टर ऐकत नाही.
. - तिकीट चुकवुन.... म्हणजे चुकुन राहिल्यास चेकर बापाचा उद्धार....
.............................
अ सो.... !
संकल्प . - घड्याळ बघता, पिशवी घेता, सुट्टॆ पैसे घेता, वाईट मूड नसेल तर, अपमान पचवण्याची तयारी नसेल तर आणि दुसरा पर्याय असेल तर पुण्यातल्या पितळेबंधु मिठाईवाले ह्या दुकानात पाऊल टाकणार नाही.
कारण -
. - गर्दीत ताटकळत उभं राहुन चक्कर येते पण आपला नंबर येत नाही.
. - वाजला की काहिही झालं तरी दुकान बंद होते. (माग एकदा त्यांच्या दुकानाला आग लागली होती म्हणे. आगीचा बंब पोहचता पोहचता वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलं आणि म्हणाले आता वाजता या.... वाजता बंद म्हणजे बंद !! )
. - पिशवी विसरली तर ते देत नाहीत. अंगुर बासुंदी पण ओंजळीत घ्या म्हणतात. पिशवीचे पैसे देतो म्हणालो तर आमचा धंदा मिठाईचा आहे, पिशव्या विकण्याचा नाही, असा आपमान करतात.
. - सुट्टे पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळ्या देतात.
संकल्प १०. - योगासनं आणि व्यायाम करणार नाही.
कारण -
. - योगासनं करताना काही चूक झाली तर ते सोडवताना खुप त्रास होतो. काल डाव्या पायाचं तिसरं बोट मी उजव्या हाताच्या करंगळीत पकडल्यानंतर पाठीचा मणका माकडहाडात अड्कुनच बसला हो.... बायकोनी पेकाटात लाथ घातली तेंव्हा...... असो...
. - व्यायाम केला की खुप थकायला होतं.... गळुन जायला होतं.... चक्कर येते..... आजारी पडायला होतं. तब्येत बिघडते.
. - इतकं करुन कुणी एक झापड जरी मारली तरी.....
.............................
अ सो.... !
संकल्प ११. - हिमेश रेशमीयाच्या आवाजातलं गाणं आणि सुनील शेट्टीचा अभिनय ह्यांच्या वाटेला जाणार नाही.
कारण -
. - डीप्रेशन येतं....
. - बीपी वाढतं....
. - डोकं फोडावसं वाटतं (स्वतःचं)
. - जीव घ्यावासा वाटतो (त्यांचा)
. - कपडे फाडावेसे वाटतात (पुन्हा स्वतःचेच)
. - भयानक स्वप्न पडतात. भास होतात...
. - पुन्हा कधीतरी ते दिसेल, ऐकु येईल असं वाटत राहतं...
संकल्प १२. - वाहतुकीचे नियम मोडणार नाही.
कारण -
. - मागच्या आठवड्यात मी मोटार-सायकल रेस मधे पहिला आलो. मग त्याच चौकात मला बक्षिस म्हणुन १०० रुपयांची पावती देण्यात आली. आता मी ठरवलय सगळे पुढे गेले तरी चालतील पण सिग्नल तोडायचा नाही.
. - झेब्रा क्रॉसिंगवर उभं राहिलो तर, "वेळ जात नाही म्हणुन आम्ही हे पट्टे मारलेले नाहियेत" अशी बहुमुल्य माहिती एका मामानी मला १०० रुपयात दिली.
. - घाई गडबडीत जोरात जात असताना रस्त्यावर मध्येच उभ्या असलेल्या मामाला....
.............................
अ सो.... !